मळगाव : मळगाव येथे 20 ते 25 युवक युवतीने घेऊन जाणारा कंटेनर ग्रामस्थांनी पकडला. यानंतर बघ्यांची फार मोठी गर्दी झाली. पोलीस निरिक्षक फूलचंद मेंगडे घटनास्थळी दाखल झाले असून चौकशी करत आहेत. सदरच्या युवक युवती ह्या हॉटेलमधील एका प्रोग्रामसाठी वेटर म्हणून काम करण्यासाठी जात असल्याचा प्राथमिक खुलासा करण्यात आला आहे.
मात्र पोलीस शहानिशा करत आहेत. यामध्ये कोणते रॅकेट तर नाही ना? असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित करत पोलिसांकडे सखोल चौकशी करावी अशी मागणी केली आहे. सर्व युवक युवती व इव्हेंट मॅनेजमेंट करणाऱ्या सर्व प्रमुखांना पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात येत आहे. सदर युवक युवतींची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करणार असल्याचे आश्वासन पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी ग्रामस्थांना दिले.





