सावंतवाडी : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येऊन सुद्धा सर्वसामान्य जनतेला मात्र स्वतंत्र दिनानिमित्त उपोषण करावे लागते हे दुर्दैव आज जिल्ह्यात राज्याचे शिक्षण मंत्री, बांधकाम मंत्री असूनही जिल्ह्याची अवस्था बिकट आहे. येथील सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी रस्ता खराब झाला म्हणून निवेदन देतात ही बाब गंभीर आहे, अशी टीका मनसेचे माजी सावंतवाडी तालुकाअध्यक्ष गुरुदास गवंडे यांनी केली आहे.
शिक्षण मंत्र्यांच्या आशीर्वादाने जिल्हाधिकारी या ठिकाणी ठाण मांडून बसले आहेत जिल्ह्याचे तीन-तीन पोलीस अधीक्षक बदली होऊन गेले तरी जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी ते जिल्हाधिकारी या पदापर्यंत गेली नऊ वर्षे या जिल्ह्यात ठाण मांडून बसणारे जिल्हाधिकारी हे अजून किती वर्ष राहतील हे शिक्षण मंत्र्यांनी जाहीर करावे. कारण शिक्षणमंत्र्यांच्या स्वतःच्याच मतदारसंघात गटशिक्षणाधिकारी प्रभारी आहेत. त्यामुळे शासन आपल्या दारी उपक्रम मुख्यमंत्र्यांनी राबवला खरा परंतु या ठिकाणी असणारे राज्याचे बांधकाममंत्री आणि शिक्षणमंत्री आणि अधिकारी हे सर्वच ठिकाणी कमी पडले त्यामुळे स्वातंत्र्यदिनी उपोषण जिल्ह्यात झाले त्यामुळे शिक्षणमंत्र्यांनी महोत्सव करण्यापेक्षा सर्वसामान्य जनतेकडे लक्ष द्यावे कारण पुढच्या निवडणुकीत शिक्षण मंत्री कुठेही उभे राहून देत त्यांचा पराभव हा निश्चितच आहे. शिक्षणमंत्र्याच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्राथमिक शाळांची पटसंख्या कमी झाली परंतु इंग्रजी माध्यमांची पटसंख्या मात्र झपाट्याने वाढत आहे, हे शिक्षण मंत्र्यांना दिसत नाही का? त्यामुळे या जिल्ह्यात शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या आशीर्वादाने सर्व सामान्य जनतेला नको असलेले जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठाण मांडून आहेत अशी टीका मनसेचे माजी सावंतवाडी तालुकाअध्यक्ष गुरुदास गवंडे यांनी केली आहे.





