श्री सिद्धेश्वर सातेरी प्रासादिक भजन मंडळ ठरले अव्वल.! ; तळवडे येथे श्रावण मास भजन स्पर्धा

409

सावंतवाडी : श्री सिद्धेश्वर उदीन्नाथ भजन मंडळ तळवडे व ग्रामस्थ यांच्या वतीने नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देऊन व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तळवडे, होडावडे, मातोंड, पेंडुर, निरवडे गाव मर्यादित तसेच २५ वर्ष वयोगटाखालील श्रावण मास भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला १३ संघांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत श्री सिद्धेश्वर सातेरी प्रासादिक भजन मंडळ यांनी प्रथम क्रमांक पटकावला असून, महेश ज्वेलर्स पुरस्कृत त्यांना पारितोषिक आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. तसेच द्वितीय क्रमांक श्री ब्राम्हणदेव प्रासादिक भजन मंडळ यांनी पटकावला असून, त्यांना जय संतोषीमाता दशावतार नाट्य मंडळाचे मालक श्री भास्कर वैद्य पुरस्कृत पारितोषिक आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तर तृतीय क्रमांक श्री क्षेत्रपालेश्वर प्रसादिक भजन मंडळ यांनी पटकावला असून, श्री दशरथ मल्हार पुरस्कृत पारितोषिक आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला आहे. याचबरोबर चतुर्थ क्रमांक इसोटी प्रसादिक भजन मंडळ यांनी पटकावला असून, श्री देवा कांबळी पुरस्कृत पारितोषिक आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तर उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक भूतनाथ प्रा. भजन मंडळ तर उत्तेजनार्थ द्वितीय अष्टविनायक प्रा. भजन मंडळ यांनी पटकावला असून, अनुक्रमें श्री बाळा दळवी आणि पंढरीनाथ मांजरेकर यांनी पारितोषिक व सन्मानचिन्ह पुरस्कृत केली होती. तसेच या स्पर्धेत शिस्तबंध संघ म्हणून उद्दिन्नाथ भजन मंडळ यांनी पटकावला असून, श्री संतोष राऊळ पुरस्कृत पारितोषिक आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

माजी सरपंच सुरेश गावडे पुरस्कृत वैयक्तिक सन्मानचिन्ह –
उत्कृष्ट गौळण जय भवानी प्रा. भजन मंडळ,
उत्कृष्ट अभंग सिद्धेश्वर प्रा. भजन मंडळ,
उत्कृष्ट गजर अष्टविनायक प्रा. भजन मंडळ,
उत्कृष्ट रुपावली नवयुवक भजन मंडळ,
उत्कृष्ट नोटेशन – ब्राम्हणदेव प्रा. भजन मंडळ
उत्कृष्ट प्रार्थना इसोटी प्रा. भजन मंडळ

पुरस्कृत श्री विलास काशिनाथ परब यांसकडून पारितोषिक आणि सन्मान चिन्ह

उत्कृष्ट वेशभूषा – जय भवानी प्रा.भजन मंडळ बांदेवाडी

उत्कृष्ट टाळवादक – थळकर प्रा. भजन मंडळ ( परबवाडी )

उत्कृष्ट कोरस – कुलदेवता प्रा. भजन मंडळ पेंडूर घोडेमुख

पुरस्कृत श्री.आत्माराम गावडे यांसकडून पारितोषिक आणि सन्मानचिन्ह

उत्कृष्ट झांजवादक – संकेत मेस्त्री जय भवानी मंडळ तळवडे

उत्कृष्ट तबलावादक – रितेश गावडे जय भवानी मंडळ तळवडे

उत्कृष्ट पखवाजवादक – विभायून, अथर्व, आप्पा गूळेकर, कृष्णा शंकर परब सिद्धेश्वर सातेरी भजन मंडळ

उत्कृष्ट हार्मोनियम वादक- अदिती स्वप्नील परब कुलदेवता प्रा भजन मंडळ मातोंड

उत्कृष्ट गायक – स्वप्निल सचिन गावडे भूतनाथ प्रा भजन मंडळ निरवडे