सावंतवाडी : महसूल विभागातील सर्वोत्कृष्ट प्रशासकीय सेवेबद्दल दाणोली सजाचे तलाठी सचिन चितारे यांना उत्कृष्ट तलाठी म्हणून शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते गौरविण्यातआले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात महसूल खात्याचा हा मानाचा सन्मान प्राप्त झाल्याबद्दल तलाठी सचिन चितारे यांचे विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.





