धाकोरेत ध्वजारोहणाचा मान माजी सैनिक दत्ताराम मुळीक यांना..!

227

सावंतवाडी :  तालुक्यातील धाकोरे गावात सेवानिवृत्त माजी सैनिक श्री. दत्ताराम शंकर मुळीक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ग्रामपंचायत धाकोरेच्या सरपंच सौ. स्नेहा निलेश मुळीक, उपसरपंच रामचंद्र गवस, प्रवीण पालव, रत्नाकर मुळीक, भारती मुळीक, अल्पेशा तोरसकर, मनाली आसोलकर, पुजा कोठावळे, ग्रामसेवक श्री. धुरी, ग्रामपंचायत कर्मचारी सुहास साटेलकर, योगेश गावकर, ग्रामस्थ अशोक मुळीक, बाबाजी गोवेकर, निलेश मुळीक, रवींद्र मुळीक, माजी सरपंच सदानंद गवस आदींसह ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.