मुंबई : ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सोबत आले तरच अजित पवारांना मुख्यमंत्री होता येईल ही अट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवार समोर ठेवली आहे. त्यामुळेच अजित पवार हे शरद पवारांचे समर्थन मिळवण्यासाठी वारंवार त्यांची भेट घेत असल्याचा दावा राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना हे वक्तव्य केलं आहे.’ त्याचबरोबर पुढे वड्डेटीवार म्हणाले की, ‘अजित पवार हे शरद पवारांना भेटण्यासोबतच त्यांच्या सोबत येण्यासाठी दया, याचना करत असावेत, असंही ते पुढे म्हणालेत. तर आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आहोत. शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीवरून थोडा संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र आज शरद पवार यांच्या बीडमधील भाषणाने तो संभ्रम दूर होईल असेही वडेट्टीवार पुढे म्हणाले आहेत.
नेमकं काय म्हणाले विजय वड्डेटीवार?
सत्तेसाठी चाललेला हा खटाटोप आहे. येथे विचारांना तिलांजली दिली आहे. विकासाला तिलांजली दिली आहे. येथे महत्त्व केवळ खुर्चीला दिसत आहे असं दिसुन येत आहे, असंही वडेट्टीवार म्हणाले आहेत. तर शरद पवारांची भुमिका बदलेल असं वाटतं नाही, त्यांनी आधी त्यांची भुमिका मांडली आहे. आताही इंडियाच्या बैठकीत ते आपली भुमिका स्पष्ट करतील, आम्हाला विश्वास आहे शरद पवार आपली भुमिका बदलणार नाहीत असा विश्वासही विजय वड्डेटीवार यांनी व्यक्त केला आहे.





