महाराष्ट्रातील होमगार्ड जवानांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पाच पदके जाहीर!

38

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला, २०२३ साठी महाराष्ट्रातील होमगार्ड आणि नागरी संरक्षणातील जवानांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पाच पदके जाहीर करण्यात आली आहेत. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र राज्याला या वेळी सर्वाधिक पदके मिळाली आहेत. सर्व पदक प्राप्त विजेत्यांचे राज्याचे पोलिस महासंचालक (होमगार्ड) डॉ. भूषण कुमार उपाध्याय यांनी अभिनंदन केले आहे.

पदक प्राप्त विजेत्यांची नावे –

१. तुषार चंद्रकांत वरंडे, (केंद्र कमांडर, होमगार्ड, सातारा).

२. अय्युबखान अहमदखान पठाण, (ऑफिसर कमांडिंग, होमगार्ड, नाशिक).

३. राजेंद्र पांडुरंग शहाकर, (होमगार्ड, अमरावती).

४. सुधाकर पांडुरंग सुर्यवंशी, (नागरी संरक्षण विभागाचे वरिष्ठ सहायक उपनियंत्रक, मुंबई)

५. विजय जनार्दन झावरे, (फायर रेस्क्यू लीडर, नागरी संरक्षण, मुंबई).