सावधान …!आम्हाला प्रिय असलेल्या तिरंगाचा अवमान होणार नाही ना..? ; पण का घेतली अशी भूमिका? नक्की वाचाचं..!

165

सिंधुदुर्ग : भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवाच्या सांगता वर्षाच्या निमित्ताने पुन्हा एकदा ‘हर घर तिरंगा’ फडकविला जाणार आहे. यासाठी प्रशासनाच्या वतीने पोस्टामार्फत राष्ट्रध्वज उपलब्ध करून दिला जात आहेत. २५ रुपयांनी हा राष्ट्रध्वज पोस्टाच्या माध्यमातून घरोघरी दिला जात आहे. मात्र हा राष्ट्रध्वज देताना प्रशासन खरंच काळजी घेते का? हे पाहणे देखील आता खूप गरजेचे आहे. ज्या ठिकाणी पोस्टामार्फत २५ रुपयांनी राष्ट्रध्वज दिले जात आहेत.
देशाच्या राष्ट्रदषाचा तिरंगा कलर हा केशरी, सफेद, व हिरवा, सफेद कलरच्यामध्ये अशोक चक्र मधोमध अशी राष्ट्रध्वजाची रचना आहे . मात्र आता होत असलेल्या काही राष्ट्रध्वजावर अशोक चक्र हे एका बाजूस आहे. हा राष्ट्रध्वजाचा अपमान आहे. हा असा राष्ट्रध्वज कसा फडकवावा? हा प्रश्न जनतेला पडला आहे.

पोस्टामार्फत जे राष्ट्रध्वज दिले गेले ते वितरित करताना प्रशासकीय अधिकारी यांचेकडून किंवा पोस्ट कर्मचारी यांच्याकडून का पाहिले गेले नाहीत.? पोस्टातून दिलेला हा राष्ट्रध्वज व्यवस्थित नसल्यामुळे काही ग्रामस्थांनी आपण असा तिरंगा फडकवून देशाच्या राष्ट्रध्वजाचा अवमान करणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. ज्या ठिकाणी असे राष्ट्रध्वज दिले गेले आहेत ते बदलून देण्यात यावे. राजकीय पक्षांच्या झेंड्यांचा अवमान झाला तर लोकप्रतिनिधींमध्ये शाब्दिक युद्ध रंगते आता तर राष्ट्रध्वजाचा आवमान होतोय आता लोकप्रतिनिधी काय भूमिका घेतील? याकडे सर्वांचे लक्ष  लागून आहे.