अभिमानास्पद.! तुळस प्रशालेतील विद्यार्थ्यांनी मिळवली तब्बल २४० प्रमाणपत्रे ; गतवर्षाचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न..!

263

सावंतवाडी : रयत शिक्षण संस्थेच्या श्री शिवाजी हायस्कूल तुळस येथे पारितोषिक वितरण समारंभ आज पार पडला. गतवर्षीच्या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेले सर्व उपक्रम स्पर्धा ,निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, विज्ञान खेळणी विज्ञान प्रयोग, गणित दिन त्यानिमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धा, एसएससी परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार, स्कॉलरशिप परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्याचा सत्कार, या सर्व स्पर्धांच्या बक्षिसांचे वितरण आज मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमांमध्ये तब्बल २४० प्रमाणपत्रकांचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाला रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य श्री.अँथोनी डिसोझा, तसेच शाळा समिती सदस्य सगुण  माळकर , शाळेचे हितचिंतक बबन नाईक गुरुजी, श्री. तांडेल भाऊ, श्री. नागवेकर, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक बबन घोडे पाटील यांनी केले तर आभार सहाय्यक शिक्षक बाबासो चौगुले यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक रामकृष्ण देसाई यांनी केले. सर्व शिक्षक वृंदांनी या कार्यक्रमासाठी मेहनत घेतली. सर्वच मुलांचे कौतुक झाल्याने मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.या प्रमाणपत्रांच्या वाटपामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवी उर्मी जागी झाली असून येत्या शैक्षणिक वर्षांमध्ये शाळेत राबवल्या जाणाऱ्या विश्वास कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.अँथोनी डिसोजा यांनी व्यक्त केला.