हिमाचल प्रदेशातील लाहौल-स्पीतीमध्ये भूकंप ; ३.४ रिश्टर स्केल तिव्रता.

57

लाहौल-स्पीती : हिमाचल प्रदेशातील लाहौल स्पीती जिल्ह्यात बुधवारी रात्री उशिरा भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 3.4 मोजली. लाहौल स्पितीमध्ये अचानक झालेल्या भूकंपामुळे घरे हादरली. लोक घाबरले, घराबाहेर पडू लागले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिलेल्या माहितीनुसार, हिमाचल प्रदेशातील लाहौल आणि स्पिती जिल्ह्यात बुधवारी 3.4 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. रात्री 11 वाजून 20 मिनिटांनी आणि 11 सेकंदला भूकंपाचे धक्के जाणवले. मात्र, यामुळे कोणतीही जीवित वा वित्तहानी झालेली नाही.

पावसाचा देखील कहर –

हिमाचल प्रदेशमध्ये पावसाचा देखील कह सुरु आहे. आता भूकंपाचे धक्के बसल्यामुळे नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली आही. सिरमौरमध्ये काल (बुधवार) झालेल्या ढगफुटीमुळे गिरी नदीच्या पाण्याची पातळी चांगलीच वाढली आहे.

24 जूनपासून सुरू असलेला पाऊस आणि पुरामुळे राज्य सरकारचे आतापर्यंत 6687.22 रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. पुरामुळे 300 हून अधिक रस्ते अजूनही बंद आहेत.

राज्याच्या वरच्या भागात पुरामुळे अधिक नुकसान होत आहे. मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू पूरग्रस्त भागाचा दौरा करत आहेत. या आपत्तीत आतापर्यंत 223 जणांचा मृत्यू झाला आहे तर 295 हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती आहे.