संजय राऊतांच्या राणेंविरोधातील “त्या” वक्तव्याचा वेंगुर्ले भाजपा कडून निषेध…!

वेंगुर्ले :  केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी येथील भाजपाच्या वतीने पोलिसांकडे करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकाराचा जाहीर निषेध करत राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया तातडीने न झाल्यास आंदोलन केले जाईल, असा इशारा जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांनी दिला. याबाबत आज वेंगुर्ले पोलिसांना निवेदन देण्यात आले.

यावेळी तालुकाध्यक्ष सुहास गवऺडळकर, महीला तालुका अध्यक्षा स्मिता दामले, जिल्हा उपाध्यक्ष ॲड. सुषमा खानोलकर व सोमनाथ टोमके, तालुका सरचिटनीस प्रशांत खानोलकर व बाबली वायंगणकर, उपनगराध्यक्षा शितल आंगचेकर, नगरसेविका श्रेया मयेकर, माजी उपनगराध्यक्ष अभिषेक वेंगुर्लेकर, नगरसेवक नागेश ऊर्फ पिंटू गावडे, नगरसेवक धर्मराज कांबळी, जि.का.का.सदस्य साईप्रसाद नाईक, जि.प.सदस्य प्रीतेश राऊळ, ता.उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्प, शक्ती केंद्र प्रमुख विजय बागकर व गणेश गावडे व शामसुंदर मुननकर, माजी सरपंच मनोज उगवेकर, युवा मोर्चाचे तुषार साळगांवकर व भुषण सारंग व प्रीतम सावंत, किसान मोर्चा चे बाळु प्रभु, बुथ अध्यक्ष रविंद्र शिरसाट, पुंडलिक हळदणकर, विजय नाईक, महीला मोर्चा च्या वृंदा गवंडळकर व वृंदा मोर्डेकर , रफिक शेख आदी उपस्थित होते.