कारिवडेत २५ रोजी जिल्हास्तरीय भजन स्पर्धा…!

सावंतवाडी : कारिवडे-पेडवेवाडी ग्रामस्थांच्या वतीने माघी गणेश जयंतीनिमित्त पेडवेवाडी शाळा नं. २ येथे बुधवार २५ जानेवारीला जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे हे चौथे वर्ष आहे. उद्घाटन सायंकाळी ५ वाजता होणार आहे.

स्पर्धेत सायंकाळी ७ वाजता अभंग महिला भजन मंडळ (कुडाळ) बुवा कोमल पावसकर, रात्री ७.४५ वाजता ओंकार महिला भजन मंडळ (कोलावळे) बुवा चैताली परब, रात्री ८.३५ वाजता श्री साटम महाराज प्रासादिक भजन मंडळ (निरवडे) बुवा नरेंद्र बोंद्रे, रात्री ९.२० वाजता श्री सनामदेव प्रासादिक भजन मंडळ (सांगेली) बुवा खेमराज सनाम, रात्री १०.३० वाजता श्री मोरेश्वर प्रासादिक भजन मंडळ (नेरुर) बुवा भार्गव गावडे, रात्री ११.१५ वाजता प्राथमिक शिक्षक कलामंच प्रासादिक भजन मंडळ (कुडाळ) बुवा राजेश गुरव, रात्री १२.०५ वाजता रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ (पिंगुळी) बुवा रुपेश यमकर यांचे सादरीकरण होणार आहे.प्रथम पारितोषिक ५००१ रुपये, द्वितीय ३००१ रुपये, तृतीय २००१, उत्तेजनार्थ १००१ व सन्मानचिन्ह. भजन स्पर्धेचे पारितोषिक वितरण व परीक्षकांचे सादरीकरण रात्री १ वाजता होणार आहे .