भारताचा विंडीजविरुद्ध सलग दुसरा पराभव ; चहलने खेचून आणलेला विजय हुसैनने हिरावून घेतला!

131

गयाना : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दुसऱ्या टी – 20 सामन्यात देखील भारताला पराभवाचीच चव चाखावी लागली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने विंडीजसमोर विजयासाठी 153 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र हे आव्हान विंडीजने 2 विकेट्स राखूनच पार केले.

फिरकीपटू युझवेंद्र चहलने भारताला पराभावाच्या दाढेतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र निकोलस पूरनची 67 धावांची खेळी अकील हुसैन (नाबाद 14 धावा) आणि अल्झारी जोसेफ (नाबाद 10 धावा) यांनी वाया जाऊ दिली नाही. भारताकडून कर्णधार हार्दिक पांड्याने 3 तर युझवेंद्र चहलने 2 विकेट्स घेतल्या.

विंडीजची अवस्था 2 बाद 2 धावा अशी झाली असताना निकोलस पूरनने विंडीजचा डाव नुसताच सावरला नाही तरी त्याने पॉवर प्लेमध्येच भारताच्या तोंडून विजयी घास हिसकावून घेण्यास सुरूवात केली.

अनुभवी निकोलस पूरनने पॉवेल 21 धावा करून बाद झाल्यानंतर पूरनने हेटमायर सोबत पाचव्या विकेटसाठी 38 धावांची भागीदारी रचत विंडीजला विजयाच्या जवळ पोहचवले होते. मात्र 40 चेंडूत 67 धावा करणाऱ्या निकोलस पूरनला मुकेश कुमारने बाद करत भारताला मोठा दिलासा दिला.

यानंतर युझवेंद्र चहलच्या 16 व्या षटकात विंडीजने तीन फलंदाज गमावले. रोमारियो शेफर्ड शुन्यावर धावबाद झाला. त्यानंतर जेसन होल्डर देखील शुन्यावर स्टम्पिंग झाला. यानंतर षटकाच्या शेवटच्या चेंडूवर चहलने शिमरॉन हेटमायरला 22 धावांवर बाद करत विंडीजला मोठा धक्का दिला.

भारतीय गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. त्याने पॉवर प्लेमध्ये ठरवून आक्रमक फटकेबाजी करत भारताच्या हातून सामना दूर नेला. त्याने 29 चेंडूतच अर्धशतक ठोकले. त्याला इतर फलंदाजांनी 15 – 20 धावा करत चांगली साथ दिली.

सलामीवीर कायल मेयर्सने 15 धावांचे योगदान दिले तर रोव्हमन पॉवेलने 19 चेंडूत 21 धावा केल्या. दुसऱ्या बाजून निकोलस पूरन आक्रमक फलंदाजी करत होता. त्याने पॉवेलसोबत 57 धावांची भागीदारी रचली.विंडीजची अवस्था 4 बाद 126 वरून 8 बाद 129 धावा अशी झाली. मात्र अकिल हुसैन आणि अल्झारी जोसेफ यांनी विंडीजला पराभवापासून वाचवले. या दोघांनी नवव्या विकेटसाठी 26 धावांची भागीदारी रचली. हुसैनने 14 तर जोसेफने नाबाद 10 धावा करत दोन विकेट्स अन् एक षटक राखून विजय मिळवून दिला.