सावंतवाडीत १५ ऑगस्टला राज्यस्तरीय मान्सून चषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन ; भाजपाचे युवा नेते संदीप गावडे यांचा पुढाकार!

60

सावंतवाडी : तालुक्यातील भाजपाचे युवा नेते संदीप गावडे यांच्या माध्यमातून सावंतवाडीत महाराष्ट्र आणि गोव्यातील खेळाडूंसाठी राज्यस्तरीय मान्सून चषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे
या स्पर्धेच्या विजेत्या संघाला 50 हजार तर उपविजेत्या संघाला 25 हजाराचे बक्षीस देण्यात येेणार आहे, अशी माहीती आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत संदीप गावडे मित्रमंडळाचे सहकाऱ्यांकडूनअनिकेत आसोलकर यांनी दिली.

ही स्पर्धा 15 ऑगस्टला सावंतवाडी येथील जिखमाना मैदानावर खेळविली जाणार आहे. यात उत्कृष्ठ खेळाडूू,उत्कृष्ठ कीपर, उत्कृष्ठ डीफेन्स व उत्कृष्ठ गोल अशी प्रत्येकी पाच हजाराची पारीतोषिके देण्यात येणार आहेत.
श्री. गावडे यांचा वाढदिवस नुकताच साजरा झाला या औचित्याने महाराष्ट्रासह गोव्यातील कलाकारांना व्यासपिठ मिळावे, यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर मंडळाच्या मित्रमंडळाच्या माध्यमातून आज या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित करुन ही माहीती देण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष चैतन्य सावंत, हेमंत पांगम, अभिषेक लाखे, किसन धोत्रे, शुभम कांबळे आदी सदस्य उपस्थित होते.
यावेळी श्री. आसोलकर म्हणाले महाराष्ट्रासह गोव्यातील खेळाडूंच्या अंगात असलेल्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी क्रीकेटच्या पलिकडे जावून आमच्या मंडळाकडून काही तरी वेगळे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा भरविण्यात आली आहे.
ही स्पर्धा एक दिवशीय असेल संघ वाढल्यास किंवा काही अडचण आल्यास दोन दिवस ही स्पर्धा खेळविली जाईल.

प्रथम संपर्क करणार्‍या 25 संघाना या स्पर्धेत सहभागी करुन घेतले जाणार आहे, तर यासाठी नियमित खेळाचे नियम ठरविण्यात आले आहेत. ज्या स्पर्धकांना वा टीमना या खेळात सहभागी व्हायचे त्यांनी 9422908853, 9421437033 या नंबरशी संपर्क साधावा, असे आवाहन मित्रमंडळाच्या पदाधिकार्‍यांकडून करण्यात आले आहे.