न्यायमूर्ती रंजना देसाई लोकपालच्या प्रमुख!

102

नवी दिल्ली : केंद्र सरकारने प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षा न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांची भ्रष्टाचार विरोधी लोकपालच्या प्रमुखपदी निवड केली आहे. तसेच त्यांची सदस्यांची शिफारस करण्यासाठी १० सदस्यीय शोध समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. संशोधन आणि विश्लेषण शाखेचे (रॉ) माजी प्रमुख सामंत कुमार गोयल आणि माहिती आयुक्त हीरा लाल समरिया हे देखील या समितीचे सदस्य आहेत.

न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर गेल्या वर्षी २७ मे रोजी हे पद रिक्त झाले होते. त्यानंतर लोकपाल प्रमुखाशिवाय कार्यरत होते. तथापि, लोकपालचे न्यायिक सदस्य न्यायमूर्ती प्रदीपकुमार मोहंती हे सध्या लोकपालचे कार्यवाह अध्यक्ष आहेत. सध्या लोकपालमध्ये पाच सदस्य आहेत व तीन पदे रिक्त आहेत. लोकपाल समितीमध्ये आठ सदस्य असू शकतात, त्यापैकी चार न्यायिक आणि बाकीचे गैर-न्यायिक असतात.