जळगाव : जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यात एक धक्कादायक प्रकर समोर आला आहे. या घटनेतील संशयितास पोलिसांनी अटक केली आहे. गावात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. गावातील बेपत्ता आठ वर्षीय चिमुकलीचा गुरांच्या गोठ्यात मृतदेह आढळून आला होता.
जळगाव जिल्ह्यातील या घटनेने महाराष्ट्र हदरला असून मुलीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर झालेल्या झटापटीत मुलीच्या डोक्यात दगड टाकून तिची हत्या केल्याची कबूली संशयिताने दिल्याची माहिती समोर आली आहे.दरम्यान गुन्ह्याच्या पडताळणीसाठी घेऊन जात असताना संतप्त ग्रामस्थांनी वहानावर दगडफेक केल्याचा प्रकार देखील घडला. या घटनेत तीन पोलीस देखील जखमी झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी ही मुलगी तिच्या गावातून गायब झाली होती. यानंतर कुटुंबियांकडून या मुलीचा सर्वत्र शोध घेतला जात होता. त्यानंतर एका ठिकणी दुर्गंधी येत असल्यामुळे पाहिले असता गोठ्यातील चाऱ्यात मुलीचा मृतदेह आढळून आला. पोलिसांकडून या प्रकरणी चौकशी सुरू केली असता एका तरुणाच्या हलचाली संशयास्पद आढळून आल्या होत्या. चौकशीनंतर पोलिसांनी त्या तरुणाला ताब्यात घेण्यात आले.





