वेंगुर्ले : तालुक्यातील मातोंड येथील दिवगंत दशावतार कलाकार राजन गावडे यांच्या कुटुंबाला भाजपचे युवा नेते संदीप गावडे यांनी आर्थिक मदत केली आहे.
यावेळी कोनशी गावचे माजी सरपंच कृष्णा गवस, दशावतार कलाकार दादा राणे कोनसकर, उदय राणे कोनसकर, सौरभ गावडे आदी उपस्थित होते. कलाकार श्री. गावडे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. याबाबतची माहिती मिळताच श्री. गावडे यांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेवून त्यांना धीर दिला.





