फ्लॅटमध्ये अडकलेल्या चिमुकल्यास ‘सामाजिक बांधिलकी’च्या कार्यकर्त्यांनी काढले सुखरूप बाहेर!

124

सावंतवाडी : शहरातील भटवाडी येथील फ्लॅटच्या बेडरूममध्ये अडकलेल्या दोन वर्षाच्या मुलाला सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्यांकडून सुखरूप बाहेर काढण्यात आले. सामाजिक क्षेत्रामध्ये सतर्क असलेल्या सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्याने काल भटवाडी येथील नक्षत्र बिल्डिंग फ्लॅटच्या बेडरूमच्या आतून दोन वर्षाच्या चिमुकल्याने कडी घातली व मुलगा जोरजोराने रडायला लागला. हा प्रकार त्या मुलाच्या आईच्या लक्षात येताच तिनेही आरडाओरड सुरू केली. सदर प्रकार पाहून शेजाऱ्यांनी सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्यांना याची माहिती दिली असता सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते संजय पेडणेकर व शामराव हळदणकर तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. तिसर्‍या मजल्याच्या बाहेरून बिल्डिंगवर चढून मोठ्या कसरतीने बेडरूमच्या खिडकीचे ग्रील कापून खिडकीतून त्यांनी बेडरूममध्ये प्रवेश केला व त्या मुलाला सुखरूप  बाहेर काढून पालकांच्या ताब्यात दिले. यामुळे सामाजिक बांधिलकीच्या कार्याबद्दल सर्वांनी समाधान व्यक्त केले. सदर मुलगा चांगलाच भयभीत झाला होता. सामाजिक बांधिलकीच्या या कार्यकर्त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.