तांबुळी गावात विद्यार्थ्यांबरोबर श्री पद्धतीची भात लागवड ; महाराष्ट्र शासन कृषी विभागाचा उपक्रम!

350

सावंतवाडी : भारत हा कृषिप्रधान देश असून भात अन्नदानाचे प्रमुख पीक आहे महाराष्ट्रामध्ये कोकणपट्टी, मावळ, चंद्रपूर, भंडारा, नागपूर व कोल्हापूर या भागात प्रमुख भात पीक घेतले जाते. भाताचे उत्पादकता तीन टन प्रति हेक्टर आहे.  या पिकावर येणाऱ्या किडी व रोगाच्या पासून बऱ्याच वेळा मोठ्या प्रमाणावर नुकसान होते कीड व रोग व्यवस्थापनासाठी एक संरक्षण उपाय योजना उपलब्ध असल्या तरी त्यासाठी वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे, त्यासाठी शेतकऱ्यांना वेळीच मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र शासन कृषी विभागातर्फे तांबुळी या गावामध्ये शाळेतल्या मुलांबरोबर श्री पद्धतीची माहिती व लागवड करणात आली .लहान मुलांपासूनच आपल्या आहारातील महत्त्वाचे पीक आहे .भात पिकाबद्दल गोडवा गोडवा निर्माण व्हावा व जास्तीत जास्त शेतकरी लागवडीकडे वळावे या उद्देशाने शाळा शाळकरी मुलांबरोबर श्री पद्धतीने लागवड करून एक छोटासा प्रयत्न किशोर कुमार कृषी विभागामार्फत करण्यात आला यातील तांबोळी या गावातील प्रगतशील शेतकरी श्री अंकुश सावंत यांच्या प्रक्षेत्रावर श्री पद्धतीने लागवड कशी करावी मार्गदर्शन करण्यात आले .मार्गदर्शनासाठी कृषी विभागातर्फे कृषी पर्यवेक्षक श्री प्रकाश घाडगे साहेब तसेच या गावचे कृषी सहाय्यक श्री मिलिंद सुरेश निकम हजर होते .मार्गदर्शनामध्ये त्यांनी आपला श्री पद्धतीमध्ये काय फायद्याचे व उत्पादनात वाढ दोन्ही गोष्टी समजावून सांगितले श्री पद्धतीमध्ये लावणी करतात 25 बाय 25 सेंटीमीटर केली जाते .योग्य वेळी कोळपणी यंत्राद्वारे कोळपणी केली जाते . भारतामध्ये कीड व रोग नियंत्रणासाठी जैविक व सेंद्रिय कीटकनाशकांचा वापर करण्याचे आवाहन केले .तसेच जमीन व पाणी यांच्या प्रदूषण रोखण्यासाठी नत्राचा अतिरिक्त वापर करू नये . नैसर्गिक पद्धतीने संरक्षण करण्यासाठी पक्षी थांबे ,लाईट ट्रॅप याचा वापर जास्तीत जास्त करावा .उत्पादन वाढीसाठी करावयाचे उपाय उत्पादन तर वाढवायचा असेल तर महत्त्वाचा त्यांनी सांगितले1.श्री पद्धतीने लागवड केली पाहिजे 2.जातीची निवड करताना योग्य जातीची निवड केली पाहिजे 3.कापणी करताना खालून केली पाहिजे किंवा वैभव विळ्याचा वापर केला पाहिजे4. खोलवर नांगरणी करणे आवश्यक आहे कारण नांगरणी किनामुळे जमिनीची फेरफलट होते .5.भाताचा सिलिका चा वापरण्याची आवश्यकता आहे 6. सिलिका चा वापर करणे
7. चिखलणी करताना गिरी पुष्पाचा वापरणे. दाटीवाटीने लागवड न कर ने 8.रोपाची लागवड करताना दोन ते तीन सेंटीमीटर सेंटीमीटर आत मध्ये रोवने 9. पट्ट्या पद्धतीने लागवड करणे तसेच पक्षी थांबे ,लाईट ट्रॅप यांचा वापर करने .
या कार्यक्रमासाठी तांबोळी गावच्या प्रथम नागरिक गावच्या सरपंच मॅडम श्री वेदिका नाईक मॅडम तसेच गावातले प्रगतशील शेतकरी उपस्थित होते तसेच तसेच शाळेतील शिक्षक वृंदावन तसेच शाळकरी मुलं व शाळेतील मुलांची पालक उपस्थित होते