देवगड : देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या मागील सत्ताधाऱ्यांनी काय केले असं म्हणत बसण्यापेक्षा तुम्ही विद्यमान सत्ताधारी आहात तुम्ही १७ महिन्यात काय केले ते जनतेला सांगा उगाच पाण्याचे राजकारण नको. असा टोला माजी नगराध्यक्ष योगेश चांदोसकर यांनी नगरसेवक संतोष तारी यांना लगावला आहे.तसेच आमदार नितेश राणे यांनी बैठक घेतल्यावर शासनाला पाणी योजना दुरुस्तीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला हा प्रस्तावदेखील आमदार नितेश राणे यांच्या मार्फतच सादर करण्यात आल्याचा खुलासाही माजी नगराध्यक्ष यांनी यावेळी केला. देवगड येथील आमदार नितेश राणे संपर्क कार्यालयात भाजप नगरसेवक गटनेते शरद ठूकरुल व माजी नगराध्यक्ष योगेश चांदोसकर सयुक्त पत्रकार परिषद झाली यावेळी ते बोलत होते.
देवगड जामसंडे नगरपंचायतीमध्ये येऊन आमदार नितेश राणे यांनी पाणीपुरवठा विषयक आढावा बैठक घेतल्यानंतरच देवगड मध्ये पाणीपुरवठा सुधारला आहे. आम्ही पाण्याचे राजकारण करत नाही मात्र सत्ताधाऱ्यांनी पाणी प्रश्न विषयक एखादा तरी प्रस्ताव शासनाकडे पाठवला असेल तर तो पुराव्यासह दाखवून द्यावा असे आव्हान माजी नगराध्यक्ष योगेश चांदोसकर यांनी दिले आहे.
मागील सत्ताधाऱ्यांनी काय केले असे म्हणणाऱ्यांनी एकदा आमच्या काळात झालेल्या पाणीपुरवठा विषयक कामांची कागदपत्रे काढून पहावीत मात्र आपल्या सतरा महिन्याच्या काळामध्ये पाणीपुरवठा सुधारावा म्हणून आपण पाठवलेला एखादा प्रस्ताव तरी दाखवावा.
आमच्या काळामध्ये २०१७ मध्ये ८० लाख रुपये देखभाल दुरुस्तीसाठी तरतूद करण्यात आली. या दुरुस्तीनंतर पाणीपुरवठा योजना व्यवस्थित चालू लागली, ६ लाख ५७ हजार लिटरची टाकी आम्ही आमच्या कालावधीत बांधली. मात्र, सध्याच्या सत्ताधाऱ्यांना ती चालू करता आली नाही. २०१८ सालामध्ये दहिबाव पूरक पाणी योजना ताब्यात घेतली यामुळे देवगडला हक्काचा पाणीपुरवठा सुरू झाला.
आमच्या काळात शिरगाव पाडाघर योजनेसाठी जो करार जीवन प्राधिकरणशी आम्ही केला त्याच करारावर कोर्ले सातंडी या योजनेची प्रगती सुरू झाली आहे. यामुळे आम्ही काय केले असे म्हणण्यापेक्षा व पाण्यामध्ये राजकारण करण्यापेक्षा तुम्ही काय केले हे जनतेला सांगा असे मत योगेश चांदोसकर यांनी व्यक्त केले आहेत, यावेळी उपनगराध्यक्ष मिताली सावंत, भाजपाचे गटनेते शरद ठुकरुल, नगरसेविका वृषाली पाटकर,भाजपा पदाधिकारी योगेश पाटकर दयानंद पाटील, नरेश डांमरी उपस्थित होते.
Home महाराष्ट्र देवगड आ. नितेश राणे यांनी देवगडच्या पाणीपुरवठा संदर्भात घेतलेल्या आढावा बैठकीनंतर प्रस्ताव शासन...





