कणकवली : येथील सदाशिव पवार गुरुजी स्मृती प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा दुसरा सरस्वती लक्ष्मण पवार साहित्य पुरस्कार डॉ. रुपेश पाटकर यांना जाहीर झाला असुन सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिर सभागृहात गुरुवार ३ ऑगस्ट रोजी सायंकाळी चार वाजता एका कार्यक्रमात त्यांना हा दरम्यान हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. डॉ. रुपेश पाटकर यांच्या ” ‘अर्जमधील दिवस’ या पुस्तकाला हा पुरस्कार मिळाला आहे. यावेळी अलीकडेच सिंधु वैभव साहित्य समूहाचा मधुसूदन निवडेकर पुरस्कार मिळालेल्या कवयित्री अंजली मुतालिक यांचाही यावेळी सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला वेंगुर्ला येथील डॉ. संजीव लिंगवत आणि पत्रकार देवयानी वरसकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच अन्यायरहित जिंदगी या शरीर विक्री व्यवसायातील समस्येवर काम करणारे अरुण पांडे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत. गेल्यावर्षी हा पुरस्कार मिळालेल्या दिशा पिंकी शेख या कार्यक्रमात ऑनलाईन सहभाग घेणार आहेत. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन सदाशिव पवार गुरुजी स्मृती प्रतिष्ठानच्या शुभांगी पवार यांनी केले आहे.





