कौतुकास्पद..! ग्रामस्थांनी बुजवले झरेबांबर रस्त्यावरील खड्डे

72

दोडामार्ग : तालुक्यातील झरेबांबर गावातील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून खड्डे बुजविण्यासाठी मागणी करण्यात आली होती.
मात्र याकडे प्रशासनाचे पूर्णतः दुर्लक्ष झाल्याने अखेर सरपंच अनिल शेटकर, उपसरपंच श्याम नाईक व ग्रामस्थांनी जांभ्या दगडाने हे खड्डे बुजविले.
सदर खड्डे बुजविल्याने वाहनचालक व प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे. झरेबांबर गावातून मुख्य रस्ता तब्बल वीस वर्षांपूर्वी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून करण्यात आला होता. त्यानंतर या रस्त्याची दुरुस्ती झाली नाही. परिणामी रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले असून हा रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला. खड्डयात पावसाचे पाणी साचल्याने वाहन चालकांना अंदाज येत नाही, त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे. सद्य:स्थितीत या रस्त्याची पुरती दुरवस्था झाली आहे. संबधित विभागाने पूर्णत: जबाबदारी झटकल्याने आणि मांगेली पर्यटकांची वाढती संख्या पाहता सरपंच अनिल शेटकर व उपसरपंच श्याम नाईक, ठेकेदार सुंदर नाईक व ग्रामस्थांनी जांभ्या दगडाने खड्डे बुजविले.