सावंतवाडी : नीट, जेईई, सीईटी, तसेच कोणत्याही स्पर्धा परीक्षेत यश मिळवायचे असेल तर फाऊंडेशन कोर्स महत्त्वाचा आहे. कारण स्पर्धा परीक्षातील यशाचे खरे रहस्य हे फाऊंडेशन कोर्समध्ये दडलेले आहे, असे प्रतिपादन परफेक्ट अकॅडेमीचे सर्वेसर्वा प्राध्यापक राजाराम परब यांनी भोसले नॉलेज सिटी येथे आयोजित सेमिनारमध्ये व्यक्त केले.
आज येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रा. राजाराम परब यांनी ‘विद्यार्थ्यांसाठी फाऊंडेशन कोर्सची उपयोग्यता’ या विषयावर आयोजित सेमिनारमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
प्रारंभी प्रा. राजाराम परब यांचे स्वागत स्कूलच्या वतीने प्रशासकीय व्यवस्थापिका सुनेत्रा फाटक यांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.
सेमिनारमध्ये आपल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानातून प्रा.राजाराम परब यांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे विद्यार्थ्यांना नीट, जेईई व सीईटी यांसारख्या अवघड परीक्षा व्यवस्थितपणे क्रॅक करण्यासाठी फाऊंडेशन कोर्स कशा पद्धतीने गरजेचा आहे, हे समजावून सांगितले. तब्बल दीड तास प्रा. परब यांनी आपल्या व्याख्यानातून विद्यार्थ्यांचे हसत खेळत सहजरित्या उद्बोधन केले.
यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी देखील प्रा. परब यांना आपल्या मनातील शंका विचारत विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षा व त्यासाठी लागणारी तयारी यांबद्दल चर्चेद्वारा संवाद साधला. प्राध्यापक परब यांनी देखील विद्यार्थ्यांना सोप्या पद्धतीने त्यांच्या मनातील शंकांचे निरसन करीत सेमिनार यशस्वीरित्या संपन्न केला.
यावेळी यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलचे इयत्ता सहावी ते दहावीचे विद्यार्थी तसेच शिक्षक वर्ग उपस्थित होते. सेमिनार यशस्वी करण्यासाठी परफेक्ट अकॅडेमी टीमचे ओमकार मांजरेकर, मंदार सर्वेकर, अक्षय कानडे, आशिष सावंत यांनी परिश्रम घेतले.





