बांदा पानवळ जिल्हा परिषद शाळेला पाण्याची टाकी प्रदान;साईप्रसाद काणेकर यांच्या माध्यमातून मागणीची पूर्तता…

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या औचित्यावर

बांदा : बांदा पानवळ येथील जिल्हा परिषद शाळेला पाण्याच्या टाकीची आवश्यकता होती. ही बाब येथील ग्रामपंचायत सदस्य शामसुंदर मांजरेकर यांनी शिवसेना शहर प्रमुख साईप्रसाद काणेकर यांच्या निदर्शनास आणून दिली. दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून साईप्रसाद काणेकर यांच्या माध्यमातून पाण्याची टाकी या शाळेला प्रदान करण्यात आली. शाळेला पाण्याची टाकी देण्यात आल्याने त्या ठिकाणी शाळेबरोबरच येथील अंगणवाडीतील मुलांचाही पाण्याचा प्रश्न सुटला आहे. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊत, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, शब्बीर मणियार, ग्रामपंचायत सदस्य श्यामसुंदर मांजरेकर, देवलयेडवे, रिया येडवे केंद्र प्रमुख संदीप गवस, शिक्षिका श्रीमती बाबर, वाफोली येथील शिवसेना पदाधिकारी अशोक परब, भाऊ वाळके, बांदा विभाग प्रमुख ओंकार नाडकर्णी यांच्यासह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.