वाडा येथे पावसामुळे तब्बल सव्वा लाखाचे नुकसान ; घराचे सिमेंट पत्रे उडून, कंपाऊंडची भिंत कोसळली

103

देवगड : देवगड तालक्यातील काल ५५ मिलिमीटर. एवढा पाऊस लागला असून या पावसात वादळी वाऱ्यासह मुळे तालुक्यातील वाडा येथील परशुराम गोविंद तावडे यांच्या शेतघराचे ८ सिमेंट पत्रे उडून १५००० रुपयाचे नुकसान झाले.तसेच वाडा येथील वंदना वासुदेव मसुरकर यांच्या राहत्या घराच्या मागील कंपाऊंडची भिंत कोसळून रक्कम रु. १,१०००० चे नुकसान झाले आहे.असे मिळून एकूण १ लाख २५ हजार रुपयाचे नुकसान झाले आहे