भाजपच्या बॅनरवर लागला राज ठाकरेंच्या एकमेव आमदाराचा फोटो,राजकीय वर्तुळात चर्चा

122

मुंबई : टोलनाका तोडफोड प्रकरणावरुन भाजप व मनसे यांच्यात सोशल वॉर सुरु आहे. वरिष्ठ पातळीवर हे राजकारण तापले असताना स्थानिक पातळीवर मात्र भाजपा मनसे यांच्यात सलोख्याचे संबंध असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चर्चिली जात आहे.
14 गाव सर्व पक्षिय विकास समितीच्या वतीने हे बॅनर लावण्यात आले असून सध्या सोशल मिडीयावर या बॅनरचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 14 गावांच्या विकासासाठी भाजपचे मंत्री रविंद्र चव्हाण यांनी निधी दिला. त्यांचे आभार मानण्यात आले आहेत. यासाठी मनसेचे आमदार राजू पाटील व विकास समिती सातत्याने पाठपुरावा करत होती. त्या कामास यश आल्याने हे फलक लावल्याचे बोलले जात आहे. असे असले तरी स्थानिक पातळीवर विकासासाठी भाजप मनसे एकत्र आल्याची चर्चा रंगू लागली आहे.
मनसेचे नेते अमित ठाकरे यांची गाडी टोल नाक्यावर अडवली गेली. या रागातून मनसे कार्यकर्त्यांनी टोलनाकाच फोडला. या तोडफोडीचे पडसाद थेट मंत्रालयात उमटले. या प्रकरणावरुन भाजपा नेत्यांनी मनसेला टार्गेट करण्यास सुरुवात केली. भाजप आणि मनसेत सोशल मिडीयावॉर सुरु झाले.