बांदा : तेरेखोल नदीपात्रात आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवकाला वाचविण्यात यश आले आहे. हेमंत सिंग (१८, रा. उत्तरप्रदेश) असे त्याचे नाव आहे. सदर युवक बांदा येथे सेंट्रींगची कामे करतो. कौटुंबिक कारणातून तो आज दुपारी आळवाडा येथील पूलावरुन आत्महत्या करण्यासाठी आला होता.
त्याचवेळी मनसेचे बांदा विभागप्रमुख मिलींद सावंत व राजा खान यांनी तातडीने पूलावर जात त्याला आत्महत्ये पासून परावृत्त केले. त्यानंतर त्याला बांदा पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले. मिलींद सावंत यांच्या समयसूचकते बद्दल त्यांचे कौतुक होत आहे.





