देवगड : नारिंग्रे बावकरवाडी येथील मंगेश शांताराम शिंदे (४५) यांचा मृतदेह शेतमांगराजवळ असलेल्या
वहाळाच्या पाण्यात आढळला. हा प्रकार मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास निदर्शनास आला.
देवगड तालुक्यातील नारिंग्रे बावकरवाडी येथील शांताराम बापू शिंदे यांची नारिंग्रे सडा
गायगोठण या भागात शेतजमीन आहे.तेथे ते दोन मुलांसमोर शेती करतात. शेत जमिनीच्या नजिक च त्यांचा शेतमांगर आहे. मंगेश शांताराम शिंदे हा त्यांच्या मुलगा नेहमी नारिंग्रे सडा गायगोठण
येथे असलेल्या त्यांच्या शेतमांगरात रात्री झोपायला जात असे. सोमवारी रात्री जेवण करून नेहमीप्रमाणे ते शेतमांगरात झोपायला गेले होते. त्यांचे वडील शांताराम बापू शिंदे हे मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास शेतमांगराकडे असलेल्या मुलासाठी चहा व नाश्ता घेऊन गेले त्यावेळी तो शेतमांगरात दिसला नाही. म्हणून मांगराजवळ असलेल्या ओहोळात गेला असेल म्हणून पाहण्यास गेले असता तेथील ओहाळाच्या पाण्यात त्याचा मृतदेह दिसला. त्यांनी त्याबाबतची तात्काळ गावातील ग्रामस्थांना माहिती दिली. ग्रामस्थांच्या सहकार्यातून पाण्यातून मृतदेह बाहेर काढण्यात आला . मात्र त्याचा मृत्यू झाला मंगेश हा अविवाहित होता. या घटनेची खबर शांताराम शिंदे यांनी देवगड पोलिसांकडे दिली असून देवगड पोलीस उपनिरीक्षक सुधीर कदम अधिक तपास करत आहेत.





