टेनिस क्रिकेटचा तारा हरपला ; रोहित बोलेकरांची अकाली एक्झिट

477

वेंगुर्ला :  मठ येथील प्रसिद्ध काजू उद्योजक सुरेश बोवलेकर यांचे चिरंजीव रोहित बोवलेकर यांचे आकस्मिक निधन गोवा येथे झाले.काही दिवसापूर्वी रोहित पडल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली होती.या दुखापती वर उपचार सुरू होते.किडनीला व लिव्हरला त्रास असल्याने आज अचानक त्यांना त्रास अधिक प्रमाणात जाणू लागल्याने त्यांना कुडाळ येथे देण्यात आले. येथून अधिक उपचाराकरीता गोवा येथे पाठवण्यात आले.गोवा म्हापसा येथील व्हिजन हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू असताना आज म्रुत्यू झाला.रोहित हे मनमिळावू व प्रेमळ असल्याने त्यांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे.रोहित हे रोहित स्पोर्ट चे मालक होते. प्रसिद्ध काजू उद्योजक सुरेश बोवलेकर यांचे ते चिरंजीव होते.रोहित यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी,आई वडील व भाऊ असा परिवार आहे.