नवी दिल्ली : औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड मतदार संघाचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना दिल्ली येथे हृदयविकाराचा धक्का आला. काही कामानिमित्त केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी गेले असताना माजी आमदार जाधवांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.





