सावंतवाडी : तालुक्यातील एका खेडेगावातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार होण्यास
संबधित अत्याचारग्रस्त मुलीच्या आईचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. त्यानुसार तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्यापपर्यंत तिला अटक करण्यात आलेली नाही. तपासासाठी आवश्यकता असल्यास तिच्यावर अटकेची कारवाई करण्यात येणार आहे, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
दरम्यान याप्रकरणी ४ दिवस पोलीस कोठडीत असलेल्या दोघा संशयितांना आज येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली.
याबाबतची माहिती या गुन्ह्याचे तपासिक अमंलदार तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे यांनी दिली. त्यातील दोघा संशयितांना आज पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यांच्याकडे केलेल्या तपासानुसार आईचा सहभाग असल्याचे
निष्पन्न झाले आहे. त्यामुळे तिला देखील ह्या गुन्ह्यात आरोपी करण्यात येणार आहे, असे पोलिसांचे म्हणणे आहे.





