नवी दिल्लीः भारतीयांच्या बाबतीत एक धक्कादायक आकडेवारी समोर आलेली आहे. या वर्षी जूनपर्यंत तब्बल 87,026 भारतीयांनी त्यांचे नागरिकत्व सोडले आहे, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी ही माहिती दिलीय.
लोकसभेत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सांगितले की, 2,25,620 भारतीयांनी 2022 मध्ये नागरिकत्वाचा त्याग केला. 2021 मध्ये 1,63,370, 2020 मध्ये 85,256, 2019 मध्ये 1,44,017, 2018 मध्ये 1,34,561,2015 मध्ये 31,489 भारतीयांनी नागरिकत्वाचा त्याग केला.
तसेच 2014 मध्ये 1,29,328, 2013 मध्ये 1,31,405, 2012 मध्ये 1,20,923 आणि 2011 मध्ये 1,22,819 भारतीयांनी त्यांचं भारतीय नागरिकत्व सोडलं. अशी माहिती परराष्ट्र मंत्र्यांनी दिली आहे.





