देवगड : खा. विनायक राऊत यांच्या माध्यमातून मणचे गावात BSNL टॉवर मंजूर झाला असून त्या टॉवर चे भूमिपूजन युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते झाले. मणचे गावातील पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी खासदार विनायक राऊत यांचे आभार व्यक्त केले. मणचे गावात बराच काळ नेटवर्क च्या समस्या होत्या, या पंचक्रोशीमध्ये नेटवर्क नसल्यामुळे ग्रामस्थांनमध्ये नाराजी होती. टॉवर साठी गावकऱ्यांच्या भरपूर मागण्या ह्या विनायक राऊत यांच्याकडे गेल्या होत्या.गावचे सरपंच दीपक तोरस्कर यांनी व युवासेना तालुका प्रमुख फरीद काझी यांनी खासदार विनायक राऊत यांच्याजवळ पाठपुरावा केला त्यामुळे हा टॉवर मंजूर झाला.

आता मणचे गावातील ग्रामस्थांची नेटवर्क ची समस्या लवकरच दूर होईल. त्यामुळे गावातील ग्रामस्थांनमधून खासदार विनायक राऊत यांचे आभार व्यक्त केले जात आहेत. या भूमिपूजन च्या वेळी युवासेना तालुका प्रमुख फरीद काझी, मणचे गावचे सरपंच दीपक तोरस्कार, उपसरपंच मन्सूर सोलकर, बापर्डे उपविभाग प्रमुख प्रकाश भेकरे, गुरुनाथ मेस्त्री, युवासेना विभागप्रमुख प्रदीप घाडी, ग्रामपंचायत सदस्य विष्णू कोतवडे, संतोष काळे, अजित गुरव,फय्याज पावसकर, तेजस घाडी, मारुती गुरव, दीपक घाडी, प्रकाश पवार, पोलीस पाटील सीताराम घाडी, सईद सोलकर, अनंत घाडी आदी शिवसैनिक पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.





