मुंबईत मुसळधार पाऊस! रेल्वे वाहतूक सेवेला मोठा फटका.!

69

मुंबई : मागील दोन तासांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे याचा परिणाम रस्ते वाहतुकी सोबतच रेल्वे वाहतूक सेवेला देखील बसला आहे. मुसळधार पावसाने मुंबईकरांची चांगलीच दाणादान उडवली आहे. मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीला बसला आहे.

पश्चिम रेल्वेची वाहतूक सेवा काही प्रमाणात विस्कळीत झाली आहे. जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे हवेतील दृश्य मानता कमी झाल्यामुळे लोकल चालवताना लोको पायलट ना काहीशा अडचणींचा सामना करावा लागत आहे यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक साधारणपणे पंधरा ते वीस मिनिट उशिराने सुरू आहे यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील विविध स्थानकांवर प्रवाशांची गर्दी देखील वाढल्याचे पाहायला मिळत आहे.