सातारा :साताऱ्यातील पाटण तालुक्यातील संणबुर एकाच कुटुंबातील चार जणांचे मृतदेह घरात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. आई-वडील आणि दोन मुलांचे मृतदेह घरात आढळले आहेत. दरम्यान ही आत्महत्या करण्यात आली आहे की हा घातपात? याबद्दल पोलीस तपास करत आहेत.
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, हे एक शेतकरी कुटुंब असून या कुटुंबातील चौघांचे मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आले आहेत. रात्री हे कुटुंब एकत्र झोपलं होतं. यामध्ये आनंद जाधव, सुनंदा जाधव मुलगा संतोष जाधव आणि विवाहीत मुलगी पुष्पलता धस अशी मृतांची नावे आहेत.
सकाळ झाली तरी घरातून कोणीच बाहेर आलं नाही. तसेच घरात त्यांचे फोन वाजत होते. यानंतर ग्रामस्थांना संशय आल्याने त्यांनी एकत्र येऊन घराचा दरवाजा उघडला. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान हा घातपात आहे की इतर काही याबद्दल अद्याप स्पष्टता नाहीये. या घटनेमागील कारण काय हे अद्याप समोर आले नसून पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.





