सावंतवाडी : गेले दोन दिवस जिल्ह्यात मुसळधार पावसामुळेठिकठिकाणीमोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे.आज झालेले अतिवृष्टीमुळे सावंतवाडी भटवाडी येथील वेदशास्त्र संस्कृत पाठशाळेच्या समोरिल बाजुची सुमारे १०० फुट लांबीची संरक्षक भिंत कोसळून नुकसान झाले आहे. ही भिंत कोसळल्याने सदरचा मार्ग काही वेळ वाहतुकीसाठी बंद होता.मात्र नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी येऊन रहदारीसाठी रस्ता मोकळा केला.
वेदपाठशाळेचे साधारणपणे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे असा प्राथमिक अंदाज वेदशास्त्र संस्कृत पाठशाळेचे अध्यक्ष बाळ पुराणिक यांनी वर्तवला आहे.





