रायगड : महाराष्ट्राला हादरवून टाकणारी घटना रायगड जिल्ह्यात घडली आहे. रायगडच्या खालापुर तालुक्यातील इर्शाळगडाच्या पायथ्याशी वसलेली ४० ते ५० घरांच्या वस्तीवर दरड कोसळलली. बुधवारी रात्रीच्या ११ वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.
धो-धो पडणाऱ्या पावसामुळे या गावार दरड कोसळली. घटना समजताच बचावपथक घटनास्थळी पोहोचलं. मात्र, रात्रीच्या वेळी असणाऱ्या काळ्या-कुट्ट अंधारामुळे आणि पावसामुळे बचावकार्याला अडथळा निर्माण झाला होता.
या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तिथे तळ ठोकून असून काही वेळापूर्वी त्यांनी माध्यमांशी बोलतांना गावचं पुनर्वसन करण्याचा शब्द दिला. या घटनेमध्ये आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झालेला असून ९३ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आलेलं आहे. तर १०० हून अधिक जण बेपत्ता आहेत.





