नवी दिल्ली : मणिपूरच्या व्हायरल व्हिडिओवरून रस्त्यावरून संसदेपर्यंत गदारोळ सुरू आहे. आता सर्वोच्च न्यायालयानेही या घटनेची दखल घेतली आहे. यावर सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी गुरुवारी जोरदार टीका करत केंद्र आणि राज्य सरकारला फटकारले आहे. जे व्हिडिओ समोर आले आहेत ते चिंताजनक असल्याचे सीजेआय चंद्रचूड यांनी म्हटले आहे. याप्रकरणी मे महिन्यापासूनच कारवाई व्हायला हवी होती, असेही त्यांनी म्हटले आहे.
या संपूर्ण पप्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारला पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. आम्ही सरकारला कारवाई करण्यासाठी थोडा वेळ देऊ, नाही तर आम्हाला कारवाई करावी लागेल असंही चंद्रचूड यांनी म्हंटलं आहे.





