मुंबई : हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील २४ तासांत राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
पहा कुठं पडणार मुसळधार पाऊस ?
यामध्ये प्रामुख्याने रायगड, पालघर, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांसाठी पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबई ठाण्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, ठाणे, नाशिक, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय उत्तर महाराष्ट्रासह विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे.





