CA परीक्षेत पूर्वा उमरोटकर चमकली | दैवज्ञ् समाजातर्फे खास सत्कार

देवगड : मुंबई विलेपार्ले विभागातील दैवज्ञ् समाजातील गुणवंत विध्यार्थीनीं कु. पूर्वा रवींद्र उमरोटकर हिने 22-23 पार पडलेल्या चार्टर्ड अकाउंट्न्ट सिएच्या परीक्षेत गुणवत्ता यादीत उज्ज्वल यश संपादन केले. पूर्वा हिच्या या यशबद्दल विलेपार्ले विभागातील दैवज्ञ् समाजाचे नाना शंकरशेठ प्रतिष्ठानचे सरचिटणीस व अखिल भारतील दैवज्ञ् समाजन्नती परिषदचे उपाध्यक्ष माजी नगरसेवक तसेच स्थानिक माजी आमदार गुरुनाथ देसाई व समाज बांधव महेश पैठणकर, जितेंद्र पितळे, बंडू डिके तसेच अजितदादा पितळे यांनी पूर्वाच्या निवास स्थानी प्रत्यक्ष भेट घेऊन शाल श्रीफळ व पुषगुच्छ देऊन अभिनंदन केले. तसेच पुढील यशदायी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात. यावेळी पूर्वाचे वडील रवींद्र उमरोटकर, आई ऋतुजा उमरोटकर व आत्या आकांक्षा पितळे, वनिता उमरोटकर उपस्थित होत्या.