मुंबई : भारताने वेस्ट इंडिजविरुद्धची पहिली कसोटी एक डाव आणि 141 धावांनी जिंकली. आता टीम इंडिया 20 जुलैपासून दुसरा कसोटी सामना खेळण्यासाठी त्रिनिदादच्या पोर्ट ऑफ स्पेनमध्ये उतरणार आहे. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया 1-0 ने आघाडीवर आहे.
दरम्यान पहिल्या सामन्यात शतक झळकावणारा कर्णधार रोहित शर्माने आयसीसी कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. तो पुन्हा एकदा आयसीसी कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीतील टॉप-10 मध्ये आला आहे.
वेस्ट इंडिजविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा युवा खेळाडू यशस्वी जैस्वालने आयसीसी क्रमवारीत प्रथमच स्थान मिळवले आहे. यशस्वी जैस्वालने पहिल्या कसोटी सामन्यात 171 धावांची सर्वोत्तम खेळी खेळली होती.





