कुडाळ : न्यू इंग्लिश स्कूल कसालच्या शिक्षिका स्नेहा सूर्यकांत बालम यांना या वर्षीचा सिंधुदुर्ग गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. हुतात्मा अपंग बहुउद्देशिय विकास कल्याणकारी संस्था, कराड या संस्थांकडून २५ वर्षापेक्षा अधिक वर्षे आदर्श व उपक्रमशिल शिक्षिका, शिक्षण क्षेत्रात केलेल्या कामाबद्दल सन्मान म्हणून आदर्श शिक्षिका. सिंधुदुर्ग गौरव पुरस्कार हा मानाचा पुरस्कार जिल्ह्याबाहेरच्या संस्थेने प्रदान केला. यावेळी कराड संस्थेचे अध्यक्ष, पदाधिकारी, विश्वस्त व मान्यवर उपस्थित होते. प्रस्ताव न करता कार्याची दखल घेऊन प्रदान केलेल्या पुरस्काराबद्दल कसाल संस्था अध्यक्ष आनंद सावंत शाळा समिती अध्यक्ष नवीन बांदेकर सचिव यशवंत परब, विश्वस्त व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले. तसेच पालक वर्गाकडूनही कौतुक होत आहे.





