सावंतवाडी : आर्ट बिटस् फाऊंडेशन या संस्थेकडून मळेवाड येथील अजित गाडगीळ याना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
आर्ट बिटस् फाऊंडेशन ही संस्था गेली २१ वर्षे सातत्याने कलाकारांना प्रोत्साहन तसेच उत्तम व्यासपीठ देण्यासाठी कार्यरत आहे. चित्र, शिल्प, संगीत, अभिनय, नृत्य, लोककला तसेच इतर सर्व कलाक्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांना आर्ट बिटस् फाऊंडेशन या संस्थेमार्फत पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.मळेवाड येथील अजित गाडगीळ याना कोकणातील दशावतार क्षेत्रात अभिनय, कथालेखन,अशा अनेक वैविध्यपूर्ण योगदानाबद्दल आर्ट बिटस् फौंडेशन या संस्थेमार्फत कला सन्मान हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.हा सन्मान महाराष्ट्र ब्राह्मण मंडळाच्या दशावतार विषयक कार्यक्रमाचे वेळेस दिग्गज ज्येष्ठ दशावतारी खलनायक मास्टर दामोदर भालचंद्र जोशी(मा.दामू जोशी) याचे हस्ते हा पुरस्कार देऊन करण्यात आला.
Home ब्रेकिंग न्यूज मळेवाड येथील अजित गाडगीळ आर्ट बिटस् फाऊंडेशनच्या कला सन्मान पुरस्काराने सन्मानित..!





