शिवसेना (उबाठा) गटाच्या महिला संघटकपदी आरोही चिंदरकर, निकिता जोशी यांची नियुक्ती..!

254

देवगड : शिवसेना उबाठा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार खासदार विनायक राऊत व संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सौ आरोही चिंदरकर देवगड यांची शहर संघटक जामसंडे विभागपदी तर सौ निकिता जोशी यांची शहर संघटक देवगड विभागपदी नियुक्ती करण्यात आली असल्याचे शिवसेना उबाठा गटाच्या महिला जिल्हाप्रमुख सौ निलम पालव यांनी जाहीर केले.त्या दोन्ही नवनियुक्त महिला पदाधिकारी यांना नुकतेच नियुक्तीपत्र देण्यात आले.