उत्तर भारतात पुराचे थैमान ; हिमाचल प्रदेशचे 8000 कोटी रुपयांचे नुकसान..!

72

नवी दिल्ली : सध्या उत्तर भारतात मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं उत्तरेकडील राज्यांमध्ये पूरस्थिती कायम आहे. दिल्ली आणि हिमाचल प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये परिस्थिती गंभीर होत असल्याने लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. रस्त्यांना नदीचं स्वरुप प्राप्त झालं आहे. रस्ते बंद झाल्यानं वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

पुरामुळं मोठं नुकसान झालं आहे. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिवृष्टीमुळे राज्याचे सुमारे 8000 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

दरम्यान, भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आजही उत्तरेकडील राज्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.