सावंतवाडी : जे गेले ते गेले त्याची फिकीर करू नका तुम्ही कामाला लागा भविष्यात दिवस आपलेच आहेत.जनता आपल्या सोबत आहे आपली जनतेशी बांधिलकी ठेवा असे आज उद्धव ठाकरे यांनी सावंतवाडी विधानसभेतील शिवसैनिकांना दिलेल्या भेटी दरम्यान सांगितलं.तसंच लवकरच कोकणचा दौरा करणार त्यावेळी सावंतवाडी विधानसभेतील सर्व शिवसैनिकाला पदाधिकाऱ्यांना भेटून चर्चा करणार व जनतेशी संवाद साधणार असा शब्दही दिला.यावेळी खासदार विनायक राऊत, जिल्हा संपर्क अरुण भाई दुधवडकर,जिल्हाप्रमुख संजय पडते,विधानसभा संपर्क शैलेची परब, तालुका प्रमुख रुपेश राऊत, यशवंत परब,संजय गवस उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, चंद्रकांत कासार,तालुका संपर्क राजू नाईक,जिल्हा समन्वयक बाळा गावडे, उपजिल्हा संघटक शब्बीर मणियार,युवा सेना गुणाजी गावडे, सागर नानोसकर,योगेश नाईक महिला,पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते





