सावंतवाडी : शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साळगावची कुमारी दुर्वा निलेश धुरी हिला इयत्ता पाचवी मध्ये राष्ट्रीय ग्रामीण शिष्यवृत्ती साठी निवड झाली तर कुमारी मयुरी धोंडीराम वाडकर हिची इयत्ता आठवी जिल्हास्तरीय ग्रामीण शिष्यवृत्तीसाठी निवड झाली या दोन्ही विद्यार्थ्यांना प्रशालेच्या श्री सलीम तकीलदार, सौ अर्चना चव्हाण, श्री विद्यानंद पिळणकर,श्री एकनाथ कांबळे,सौ.सुप्रिया पेडणेकर, श्री राहुल कानडे या शिक्षक वर्गाचे मार्गदर्शन लाभले.या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांनचे तसेच पालक वर्गाचे व मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्था अध्यक्ष श्री प्रदीप प्रभुतेंडोलकर संस्था सचिव श्री मुकुंद धुरी, सर्व संचालक तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक श्री सलीम तकीलदार ,शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष श्री वासुदेव मेस्त्री यांनी अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या
Home ब्रेकिंग न्यूज शिवराज मराठा विद्यालय साळगावच्या दुर्वा धुरी व मयुरी वाडकर यांची शिष्यवृत्तीसाठी निवड..!





