सिंधुदुर्ग : पोलीस पथकाने आजगाव येथे 7 जुलै रोजी छापा मारून संतोष लुडबे आणि वेश्याव्यवसाय साठी आणलेल्या 3 मुलींना ताब्यात घेतले होते. आरोपी संतोष लुडबेवर पिटा कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्याला आज वेंगुर्ले येथील न्यायालयात हजर केले असता त्याला 15 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
तर त्या तिन्ही मुलींची रवानगी सावंतवाडी येथील अंकुर महिला सुधारगृहात करण्यात आली आहे. दरम्यान संतोष लुडबे अध्यक्ष असलेल्या अन्नपूर्णा सेक्स वर्कर वेल्फेअर असोसिएशन या संस्थेत आणखी 6 सदस्य आहेत. यातील संशयित पदाधिकारी व सदस्य म्हणून मदन मांजरेकर उपाध्यक्ष, विकास सारंग सचिव, तर विश्वस्त म्हणून गीता लुडबे, सोनू घोलप, प्रशांत पानकर, भूषण ढवळे यांची नावे असून यातील एक व्यक्ती मुंबई तर अन्य सदस्य हे हे आसपासच्या गावातील आहेत. संशयित संतोष लुडबे चालवत असलेल्या अनैतिक व्यवसायबाबत ह्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सहभाग होता अथवा कसे ? याबाबत चौकशी करून तसे आढळल्यास कारवाई करणार असल्याचेही पोलीसाकडून सांगण्यात आले.





