दिर्बादेवी थांब्याजवळ झालेल्या अपघातामधील तेजस बांदेकर याचा उपचारादरम्यान निधन

235

देवगड : आगारातील देवगड वानिवडे प्रवासी फेरी दिर्बादेवी थांब्याजवळ आली असता शनिवारी झालेल्या अपघातामधील तेजस तुषार बांदेकर वय २५ याचा कोल्हापूर येथे उपचारादरम्यान शनिवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास निधन झाले. तर तन्मय तुषार बांदेकर वय २० याच्यावर कोल्हापूर येथे उपचार सुरू आहेत तेजस बांदेकर याचा निधन झाल्याची वृत्त समजतात आनंदवाडी गावासह देवगड शहरात दुःख व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान व्यसनाच्या आहारी जाऊन मद्य प्राशन करून गाडी चालवणाऱ्या एसटी चालक व वाहकांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे .आता तरी देवगड आगाराचे व्यवस्थापक निलेश लाड अशा बेजबाबदार वाहन चालकांवर कठोर कारवाई करणार का? असा सवाल प्रवासी वर्गांमधून व्यक्त करण्यात येत आहे..