जामसंडे दीर्बादेवी स्टॉप येथे एसटी दुचाकी यामध्ये भीषण अपघात..!

490

देवगड : जामसंडे दीर्बादेवी स्टॉप नजीक मोटरसायकल आणि एसटी यामध्ये शनिवारी सकाळी ८ च्या सुमारास अपघात झाला. ही धडक एवढी जबरदस्त होती की मारुती माने यांच्या दुकानाच्या छपराला धडक देऊन पूर्णता कोसळून मोटरसायकलच्या अंगावरती पडून गंभीर जखमी झाले आहेत.त्यामध्ये मोटरसायकल वरील दोन युवक हे देवगड आनंदवाडीतील असल्याचे समजतात त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. त्याला ग्रामीण रुग्णालयात नेण्याचे समजते.